Advertisement

गोदापात्रात एसपींचा (Sp) पहिला दणका

प्रजापत्र | Tuesday, 31/12/2024
बातमी शेअर करा

समीर लव्हारे 

बीड-पोलीस अधिक्षक (Superintendent of Police (S.P.) म्हणून नव्याने पदभार घेतलेल्या नवनीत कॉवत (Navneet Kanwat) यांनी अखेर गोदापात्राकडे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. चकलांबा पोलीस ठाण्यातील (chaklamba police station) अंमलदार आणि सध्या गेवराईच्या उपविभागीय कार्यालयात संलग्न असलेले अशोक तिपाले यांची उचलबांगडी करण्यात आली. काल रात्री उशिरा ही ऑर्डर काढण्यात आली असून त्यांची बर्दपूरला बदली झाली आहे.

     पोलीस अधिक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी पदभार घेतल्यापासून ऍक्शन मोडमध्ये येतं अनेक कारवायांना हात घालण्यास सुरुवात केली. चकलांबा पोलीस ठाण्यातील अंमलदार असलेल्या अशोक तिपाले यांच्याबाबतीत तक्रारी असल्याने त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे.अशोक तिपाले हे गेवराईच्या उपविभागीय कार्यालयात संलग्न होते. गेवराईचे उपविभागीय अधिकारी श्री.राजगुरू यांच्याकडे ते मागील काही दिवसांपासून काम करत होते. गोदापात्रात माफियासोबत त्यांचे संबंध असल्यामुळे पोलीस अधीक्षकांनी या कारवाईच्या माध्यमातून मोठा इशारा दिल्याचे मानले जाते. त्यामुळे आता आणखीन कोणत्या कोणत्या कर्मचाऱ्यांची विकेट जाते का? याच्या चर्चा देखील सुरु झाल्या असून तिपाले यांना बर्दपूर पोलीस ठाण्यात प्रशासकीय कारण देत बदली करण्यात आली.त्यामुळे गोदापात्रात खळबळ उडाली आहे.

 

 

व्यवस्थेचे 'होयबा' आणि अवैध धंद्यातील लागेबंध असणाऱ्यांच्या बदल्या?

दरम्यान पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी प्रजापत्रशी बोलताना अशोक तिपालेच नव्हे तर अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने माझा अभ्यास सुरु आहे. जिल्हाभरातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संदर्भाने मोठे निर्णय घेण्यात येतील असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आता अनेकांच्या बदल्या होतील आणि पोलीस विभागात मोठे फेरबदल पाहायला मिळतील असे चित्र आजघडीला निर्माण झाले आहे.

 

 

Advertisement

Advertisement