मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकारण तापलेले आहे. महायुतीमध्येही राजकीय दुफळी निर्माण झालेली असतानाच माजी मंत्री (Jaydatta Kshirsagar)जयदत्त क्षीरसागरांनी सोमवारी मुख्यमंत्री (Devendra Fadnavis)देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सह्याद्री अतिथीगृहात या दोन नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री (Jaydatta Kshirsagar) जयदत्त क्षीरसागर यांनी स्वतः निवडणूकितून माघार घेत महायुतीचे उमेदवार असलेले पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला, मात्र त्यांनी लगेच माजी मंत्री (Jaydatta Kshirsagar)जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनातच पुढील निवडणुका लढविणार असल्याचे म्हटले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून जयदत्त क्षीरसागर कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. सर्वच राजकीय पक्षांपासून अंतरावर असलेल्या जयदत्त क्षीरसागरांनी आता अचानक (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्यामुळे आता या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.