बीड दि.२९ (प्रतिनिधी): कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४५ वर्षीय मजुराने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना पुणे येथे घडली आहे. सदरील मजूर बीड तालुक्यातील अंथरवणपिंप्री येथील आहे.
सविस्तर माहिती अशी की,गणेश श्यामा राठोड (रा. अंथरवणपिंप्री तांडा, वय ४५ वर्षे) हे गेल्या काही महिन्यांपासून पुणे येथे भाजीपाला विकून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करत आहेत. राठोड हे कर्जबाजारी झाल्याने सतत नैराश्येत राहत होते. रात्री त्यांनी पुणे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
बातमी शेअर करा