Advertisement

धनंजय मुंडेंच्या संदर्भाने काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते ?

प्रजापत्र | Friday, 27/12/2024
बातमी शेअर करा

बीड दि. २७ : संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांची झालेली हत्या दुर्दैवीच आहे, मात्र या हत्येच्या आडून (Dhananjay Munde) धनंजय मुंडेंना टार्गेट केले जात असेल, वंजारा समाजाला टार्गेट केले जात असेल तर हे योग्य नाही. असेच होणार असेल तर उद्या आम्ही देखील वेगळे मोर्चे काढू अशी भूमिका वकील (Gunratna Sadavarte) गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली आहे. तपास यंत्रणेला त्यांचे काम करू द्य, पण कोणी या घटनेच्या आडून धनंजय मुंडेंना पदावरून दूर करा अशा मागण्या करणार असेल तर आम्ही सुद्धा धनगर, वंजारी क्रांती मोर्चा काढू असेही सदावर्ते यांनी म्हटले आहे.

 

 

मयत(Santosh Deshmukh Murder) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्या (Beed) बीडमध्ये मोर्चा निघत आहे. मात्र आता या मोर्चाला गुणरत्न सदावर्ते यांनी आव्हान दिले आहे. या मोर्चाचा हेतू काय ? यातून जातीय तेढ निर्माण केली जात आहे का असा सवाल सदावर्ते यांनी केला आहे. या मोर्च्याच्या माध्यमातून (Dhananjay Munde) धनंजय मुंडेंचे मंत्रिपद टार्गेट केले जात आहे हे योग्य नाही. या विषयावर बोलण्याचा आमदारांना अधिकार आहे मात्र आमदार आपली शपथ विसरले आहेत. एखाद्याच्या मृत्यूचे किती राजकारण करावे याला काही मर्यादा असतात. धनंजय मुंडे सहआरोपी असल्याचे काही पुरावे आहेत का कोणाकडे ? मग विनाकारण का टार्गेट केले जात आहे? यातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार आ. सुरेश धस आणि बीडचे आमदार का करीत आहेत असा सवाल देखील (Gunratna Sadavarte) गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला आहे. जिल्ह्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, कोणीही कायदा हातात घेण्याची भाषा करू नये, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे मात्र आज वाल्मिक कराड यांना फाशी द्या म्हणणारे लोक , त्यांनी न्यायालय बनून कोणालाही दोषी ठरविले आहे का ? धनंजय मुंडे जनतेची कामे करतात म्हणून त्यांना राजकारणातून बाजूला करण्यासाठी कोणी कोणत्या मोर्च्याच्या नावाने राजकारण करणार असेल तर आम्ही देखील बहुजन मोर्चा म्हणून भूमिका घेऊ असेही (Gunratna Sadavarte) सदावर्ते यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. 

Advertisement

Advertisement