बीड दि.२७ (प्रतिनिधी)- केज तालुक्यातील मस्साजोगमधील (Sarpanch Santosh Deshmukh)सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण आणि खंडणीचा तपास सीआयडी मार्फत करण्यात येतं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करण्यात येतं असल्याची माहिती कळते. (beed)याबाबत सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृत दुजोरा दिलेला नाही. मात्र राजेश पाटील यांचा आरोपीमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचे कळते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडमुळे राज्यात वातावरण ढवळून निघाले आहे. यातील चार आरोपी अजून फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु असताना (Massajog) केजमधील पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या अडचणी आता वाढणार आहेत. त्यांना याप्रकरणात सहआरोपी करण्यात येणार असल्याचे कळते. त्यामुळे (Cid)सीआयडीने कारवाईचा वेग वाढवला असून आता तपास आणखी पुढे कसा कसा जातो हे पाहणे महत्वाचे ठरेल.

बातमी शेअर करा