Advertisement

सरपंच देशमुख हत्या प्रकरणी शनिवारी मोर्चा

प्रजापत्र | Monday, 23/12/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या बैठकीत अनेक मत सर्व उपस्थितांनी मांडले. देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र येवून प्रयत्न करायला हवे असे मत या बैठकीत मांडले.यावेळी उपस्थित सर्वांनी एकमताने (दि.२८) डिसेंबर २०२४ रोजी बीड मध्ये भव्य मोर्चा काढावा असे ठरवले गेले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे.

Advertisement

Advertisement