बीड दि.२२ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या धोरणेचे पडसाद हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात उमटल्यानंतर नव्याने पदभार घेतलेल्या पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत (Navneet Kanwat) (Sp Beed) यांनी बीडमधील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना राजकीय दबावाला बळी पडल्यास थेट तुमचा बळी जाईल असा इशारा दिला आहे. उद्या (दि.२३) सकाळी गुन्हे आढावा बैठक होणार असून यात जिल्ह्यातील प्रभारींना पोलीस अधीक्षक मार्गदर्शन करणार आहेत.
अविनाश बारगळ यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदली केल्यानंतर शनिवारी रात्री १०.४० च्या सुमारास नवनीत कॉवत यांनी पदभार घेतला. त्यानंतर सकाळी पत्रकारांशी सवांद साधताना त्यांनी जिल्हा पोलीस दलाची भूमिका स्पष्ट केली. कायदा सर्वांना समान असून पोलिसांवरील विश्वास वाढविण्याचे काम आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले. (He said that the law is equal for all and we will work to increase trust in the police.) तसेच मस्साजोग प्रकरण (massajog case) असेल किंवा इतर घटनेतील आरोपींना तातडीने अटक करण्यासंदर्भात पाऊले उचलण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यानंतर त्यांनी बीड शहरातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी बीडमध्ये काम करण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सवलत राहिलं. चुकीची घटना घडल्यास कोणालाही सोडू नका. राजकीय दबावातून काही उलटसुलट निर्णय घेतला तर उद्या बळी तुमचाच जाईल असा इशाराही नूतन पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वाभंर गोल्डे,उमेश कस्तूरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उस्मान शेख,शितलकुमार बल्लाळ, मारूती खेडकर,शिवाजी बंटेवाड, अशोक मोदीराज,श्री.गात, डीएसबीचे इंगळे यांच्यासह इतर अधिकार्यांची उपस्थिती होती. उद्या गुन्हे आढावा बैठकीत नवनीत कॉवत जिल्ह्यातील प्रभारींना सूचना देणार आहेत.
बीडच्या बिहार होतोय का?
बीडचा बिहार झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच नवनीत कावत म्हणाले की, "वैयक्तिकरीत्या मी या गोष्टीशी सहमत नाही. कारण मी मानतो की, हे दोन्ही भारताचेच भाग आहेत. माझं लक्ष्य आहे की, जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली पाहिजे. लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढेल, यादृष्टीने काम केलं जाईल ," असं काँवत म्हणाले.
अनेक पोलीस कर्मचारी पुढाऱ्यांचे ताईत
बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत अनेक पोलीस कर्मचारी पुढाऱ्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. एखादी घटना घडली किंवा आरोपींना अटक केली त्याची सर्वात आधी माहिती पुढाऱ्यांना मिळते. त्यामुळे गुन्हा दाखल होऊ नये यासाठी अनेकवेळा राजकीय दबाव वाढविला जातो. त्यामुळे आता कोणी राजकीय दबावातून किंवा पुढाऱ्यांच्या प्रेमातून काम केले तर अश्या अधिकाऱ्यांना थेट घरी पाठविले जाईल असा इशारा ही पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिला.
एका रुपयाही घेतला तर गाठ माझ्याशी
पोलीस जनतेचे सेवक आहेत.‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला खाकीचा विश्वास वाटला पाहिजे.अन्याय झाल्यास गुन्हे दाखल करा,खोटी गुन्हे दाखल होणार नाहीत याची काळजी घ्या. यासोबतच कोणत्याही नागरिकांकडून एक रुपयाही घेतल्यास त्याची माहिती मला आली तर मी कारवाई करेल असा इशाराच पोलीस अधिक्षकांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीतून दिला आहे.
अवैध धंदे चालणार नाहीत...
आढावा बैठकीत बोलताना पोलीस अधिक्षकांनी 'अधिकाऱ्यांनी माझ्याबद्दल माहिती घेतली असेलच.मी आतापर्यंत एका रुपयाही अवैध मार्गाने घेतलेला नाही असा माझा स्वभाव आहे.'पोलिसांनी पोलिसांचे काम करावे.त्यामुळे कोणतेही अवैध धंदे (Illegal businesses will not work...) मला चाललेले जमणार नाहीत.त्याची माहिती जर मला आली तर मी थेट कारवाई करेल अशा इशारा देखील त्यांनी आजच्या आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना दिला आहे.