कल्याण मध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरीची घटना समोर आली आहे. परप्रांतीय व्यक्तीने एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. उत्तम पांडे (वय ४०) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पांडे याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या मराठी कुटुंबाला पांडे व त्याच्या पत्नीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा