मुंबई दि.२१(प्रतिनिधी): राज्यमंत्रीमंडळाचे खाते वाटप अखेर जाहीर झाले असून गृहखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. एकनाथ शिंदेंना नगरविकास तर अजीत पवारांकडे अर्थमंत्रालय कायम असून बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा तर पंकजा मुंडेंकडे पर्यावरण, वातावरण बदल आणि पशू संवर्धन ही खाती देण्यात आली आहेत. लातूर जिल्ह्यातून बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची धुरा देण्यात आली आहे.
मागच्या रविवारी राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार झाला होता तेव्हापासून खातेवाटप रखडले होते. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. भाजपने गृह, ऊर्जा आदी महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. बीड जिल्ह्याच्या वाट्याला धनंजय मुंडेंच्या माध्यमातून अन्न व नागरी पुरवठा हे खाते आले आहे तर पंकजा मुंडे पर्यावरण आणि पशू संवर्धन ही खाती सांभाळणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, ऊर्जा, विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क ही खाती आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास, गृह निर्माण आणि सार्वजनिक बांधकाम(उपक्रम) ही खाती देण्यात आली आहेत. अजीत पवारांकडे वित्त व राज्य उत्पादन शुल्क तर चंद्रकांत बावनकुळेंना महसूल खाते देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे - जलसंवर्धन, हसन मुश्रीप-वैद्यकीय शिक्षण, चंद्रकांत पाटील -उच्च व तंत्रशिक्षण, गिरीष महाजन-जलसंवर्धन(विदर्भ तापी, कोकण), गणेश नाईक-वन, गुलाबराव पाटील -पाणी पुरवठा व स्वच्छता, दादा भुसे-शालेय शिक्षण, संजय राठोड-मृद व जलसंधारण, धनंजय मुंडे-अन्न व नागरी पुरवठा, मंगलप्रभात लोढा-कौशल्य विकास, उदय सावंत -उद्योग, जलकुमार रावल-मार्केटींग व राजशिष्टाचार, पंकजा मुंडे-पर्यावरण व पशु संवर्धन, अतुल सावे-ओबीसी कल्याण, दुग्ध विकास व अपारंपारीक ऊर्जा, अशोक ऊईके-आदीवासी विकास, शंभूराजे देसाई-पर्यटन खनीकर्म, आशिष शेलार-माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य, दत्तात्रय भरणे-क्रिडा व अल्पसंख्यांक विकास, आदिती तटकरे-महिला बालकल्याण, शिवेंद्रसिंह भोसले-बांधकाम, माणिकराव कोकाटे-कृषी, जयकुमार गोरे-ग्रामविकास, नरहरी झिरवाळ-अन्न औषध प्रशासन, संजय सावकारे-वस्त्रोद्योग, संजय सिरसाट-सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक -परिवहन, भरत गोगावले-रोजगार हमी, मकरंद जाधव-मदत व पुनर्वसन, नितेश राणे-मत्स्य व बंधरे, आकाश फुंडकर-कामगार, बाबासाहेब पाटील-सहकार, प्रकाश आबिटकर-आरोग्य असे खाते वाटप करण्यात आले आहेत.
बातमी शेअर करा