Advertisement

महायुती सुसाट गुन्हेगार मोकाट;विरोधकांचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 17/12/2024
बातमी शेअर करा

नागपूर - परभणी आणि बीड प्रकरणात सरकार विरोधकांना एकूण घेण्यास तयार नाही. बहुमताच्या बळावर काम चालवत आहे. गुन्हेगारांना वाचविण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप करीत महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला.

विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वातील मोर्चात आमदारांनी घोषणाबाजी करीत सरकारवर ताशेरे ओढले. सत्ता महायुतीची पाठराखण हत्येतील आरोपींची, हत्येतील आरोपीचे साथीदार असंवेदनशील महायुती सरकार अशा आशयाचे फलक झळकावत विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केली. यावेळी भाई जगताप, सचिन अहिर, नाना पटोले, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, राहुल पाटील, सचिन भोईर आदी सहभागी झाले.

 

परभणी प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यु झालेल्या सूर्यवंशी च्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट उल्लेख आहे की, त्याचा पोलिसाच्या मारहाणीत मृत्यु झाला. बीड मधील सरपंचाच्या खून प्रकरणात सरकार आरोपीला पाठीशी घालत आहे. या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी आणि त्यांचे हस्तक सहभागी असल्याने महाविकास आघाडीने आंदोलनाची भूमिका घेतली असून हा विषय आम्ही सभागृहातही उचलून धरणार आहोत.

- अंबादास दानवे विरोधी पक्षनेते विधान परिषद

 

Advertisement

Advertisement