Advertisement

बीडच्या कन्येचे पेंटिंग सोनू सुदच्या डिपीवर

प्रजापत्र | Friday, 22/01/2021
बातमी शेअर करा

बीड- बीड जिल्ह्याला कलाकारांचा बालेकिल्ला मानले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखणीय कामगिरी करणारे कलाकार बीडने दिले आहेत. अशाच बीडच्या एका कन्येने काढलेले पोर्ट्रेट पेंटिंग चक्क अभिनेता सोनू सुदच्या इंस्टाग्राम वॉलवर झळकत आहेत.

 

आरती इंगळे-पवार या बीड येथील कलाकार असून त्यांना चित्रकलेचा छंद आहे. विशेषतः व्यक्तींचे पोर्ट्रेट काढणे यात त्यांचा हातखंडा आहे. एका वेगळ्या शैलीत काढण्यात आलेले पोर्ट्रेट हा कायम अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेला असतो. त्यांनी आतापर्यंत अनेक व्यक्ती आणि कलाकारांचे पोर्ट्रेट काढले आहेत. असेच त्यांनी काढलेले सोनू सुद या अभिनेत्याचे पोर्ट्रेट सध्या सोशल मीडियावर ट्रेड होत आहे. स्वतः सोनू सुदने या पोर्ट्रेटला आपल्या इंस्टाग्रामच्या भिंतीवर स्थान दिले आहे.

                       आरती इंगळे-पवार 

Advertisement

Advertisement