बीड दि.१२ (प्रतिनिधी)- शहरातील केएसके महाविद्यालयामध्ये बीएससी तृतीय वर्षाच्या (वय २२) वर्षीय विद्यार्थ्याचा परीक्षा देताना हृदयविकाराचा झटका आला. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यु झाल्याचे घोषित केले.
कोरोनाच्या नंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. हृदयविकाराने तरुणांनाही आपल्या कवेत घेतले असल्याने हि चिंतेची बाब ठरत आहे. आज (दि.१३) रोजी शहरातील केएसके महाविद्यालय येथे बीएससी तृतीय वर्षाचा विद्यार्थी मासाळ सिद्धांत राजाभाऊ (रा. एकतानगर,बीड) हा परीक्षा देण्यासाठी आला होता. तो परीक्षा हॉलमध्ये कोसळला त्यास प्राध्यापक आणि प्राचार्य यांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून मृत्यु आल्याचे घोषित केले. अवघ्या २२ वर्षाच्या सिद्धांतचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.