Advertisement

 विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची कोळंबकरांनी घेतली शपथ

प्रजापत्र | Friday, 06/12/2024
बातमी शेअर करा

 मुंबई- विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज (दि. ६) राजभवनामध्ये राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून (pro time speaker) आमदार कालिदास कोळंबकर यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

 

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यासाठी हंगामी अध्यक्षांची निवड केली जाते. ७, ८ आणि ९ डिसेंबर या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशना दरम्यान हंगामी अध्यक्ष विधानसभेतील नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष पद भूषवणार आहेत. पुढील तीन दिवसीय अधिवेशनात कोळंबकरांकडे हंगामी अध्यक्ष पदाची जबाबदारी राहील. पहिल्या दोन दिवसांत नवनिर्वाचित आमदारांना ते शपथ देतील. ९ डिसेंबररोजी नव्या अध्यक्षाची निवड होईल. आमदारांच्या बहुमताने विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येईल.दरम्यान, महायुती सरकारचा गुरूवारी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा झाला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

 

Advertisement

Advertisement