बीड दि.4 (प्रतिनिधी)ः गुटखा माफिया असलेल्या महारूद्र उर्फ आबा मुळेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री धाराशिवमधून अटक केली आहे. आबा मुळेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली असून मुळेला हार्सुल कारागृहाकडे रवानगी करण्यात आल्याचे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी आणि विक्रीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे आबा मुळेवर दाखल होते. काही दिवसांपूर्वी आबा मुळेला आंबडच्या बसस्थानकातून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अटक केली होती. त्याच्यावर मोठे गुन्हे दाखल असल्याने एमपीएडीचा प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे पाठविण्यात आला होता. अखेर त्याला मंजूरी मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला धाराशिवमधून काही वेळापूर्वी अटक केल्याचे कळते. स्थानिक गुन्हे शाखेतील विघ्ने यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती असून आरोपीला हार्सुल कारागृहाकडे घेवून जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रजापत्रशी बोलताना सांगितले आहे.
बातमी शेअर करा