आष्टी दि.४ (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर काम करणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघाजणांकडून अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील एक कुटुंब मागील दोन वर्षांपुर्वी आष्टी तालुक्यातील एका गावात वीटभट्टीवर कामासाठी आले होते. याच कालावधीत मार्च २०२४ मध्ये एक अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी याच गावातील शाळेत रेल्वे पटरीच्या बाजूने जात असताना अनोळखी तिघेजण रेल्वेतून उतरले व यातील दोघांनी तिच्या हाताला धरून शेजारच्या शेतात घेऊन गेले. यातील एकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना समोर आली. असून पिडीता यातून ९ महिन्याची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून (२ डिसेंबर) रोजी अनोळखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.