मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने आपली तक्रार मागे घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपली धनंजय मुंडेंवर तातडीने कारवाई न करण्याची आपली भुमिका योग्यच होती असे म्हटले आहे.
'धनंजय मुंडेंवरिल आरोपांची अगोदर चौकशी झाली पाहिजे, कोणी आरोप केले म्हणून लगेच कारवाई नको, चौकशित दोषी आढळले तर कारवाई करु' अशी भूमिका आम्ही घेतली होती, ती योग्यच होती असे आज शरद पवार यांनी म्हटले आहे.
तर खा. सुप्रिया सुळे यांनिही आज पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे. हनीट्राप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्रात असे चालणार नाही असे सुळे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करा