Advertisement

धनंजय मुंडे सेफ, 'त्या' महिलेकडून तक्रार मागे

प्रजापत्र | Friday, 22/01/2021
बातमी शेअर करा

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या ' त्या' महिलेने आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सेफ झाले आहेत. मागील दोन आठवडे धनंजय मुंडेंभोवती आरोपांचे वादळ घोंघावत होते. मुंडे आता त्यातून सुरक्षीत बाहेर आले आहेत.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करित खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्दच अडचणीत येते की काय असे चित्र निर्माण झाले होते. मात्र सदर महिलेबद्दलच अनेकांच्या तक्रारी पुढे आल्या आणि सदर महिला अनेकांवर जाळे टाकत असल्याच्या तक्रारीनंतर प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली. राष्ट्रवादीने ठामपणे धनंजय मुंडेंसोबत उभे राहण्याचा निर्णय घेतला होता तर सदर महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यामार्फत सुरु करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता सदर महिलेने आपली तक्रारच मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंवरचे किटाळ दुर झाले आहे.

Advertisement

Advertisement