Advertisement

केजरीवालांचा 'इंडिया' आघाडीला धक्‍का!

प्रजापत्र | Sunday, 01/12/2024
बातमी शेअर करा

दिल्‍ली - दिल्‍लीतील आगामी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी कोणत्‍याही पक्षाशी युती करणार नाही. आमही स्‍वबळावर निवडणुका लढवू, असे आज (दि.१) आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्‍पष्‍ट केले. दिल्‍लीतील त्‍यांनी इंडिया आघाडीला धक्‍का देत एकला चलो रेचा नारा दिला आहे. आता येथील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

 

 

भाजपविरोधी इंडिया आघाडीमध्‍ये एकूण २६ पक्ष आहेत. आघाडीने दिल्‍लीत लोकसभा निवडणूक एकत्र लढवली होती. मात्र सर्वच जागांवर भाजपने विजय मिळवला होता. दिल्‍ली विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकत्र येईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र आता केजरीवाल यांनी स्‍वबळावर निवडणुका लढविण्‍याची घोषणा केल्‍याने इंडिया आघाडीला धक्‍का बसला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नाकारली होती. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपची आघाडी झाली नव्‍हती.

दिल्‍ली विधानसभेतील एकुण ७० जागांपैकी ६२ आमदार आम आदमी पार्टीचे आहेत. सत्ताधारी आपने अलीकडेच ११ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. यामध्‍ये भाजप आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सहा नेत्यांचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement