Advertisement

बीडमध्ये डॉ.बाबा आढाव यांच्या उपोषणाला समर्थन

प्रजापत्र | Saturday, 30/11/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.३०(प्रतिनिधी ):- (evm) ईव्हीएम मशीनच्या विरोधात (baba adhav)डॉ.बाबा आढाव यांचे पुणे येथे उपोषण सुरू आहे. या उपोषणाला (beed)बीड येथील महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने समर्थन देण्यात आले असून शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

 

  अधिक माहिती अशी कि, विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये अफलातून निकाल लागला आहे. निकालाबाबत संशय व्यक्त केला जात असून ईव्हीएम (evm) मशीन बंद करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ नेते (baba adhav)बाबा आढाव हे पुणे येथे उपोषण करत आहेत. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने समर्थन देण्यात आले. (beed)शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी  राजकुमार घायाळ,मा.आ.उषा दराडे,शेरजमाखान पठाण यांच्यासह बीड हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष शेख मुस्तफा,भास्कर खांडे,समता प्रतिष्टानचे किरण घाडगे,शुभांगी कुलकर्णी,सामजिक कार्यकर्ते भास्कर बागडे,भारत जोडो अभियानाचे जीवन राठोड,पेंटर संघटनेचे शेख मैनुद्दिन,बंडु दळवी,सय्यदअजमतअली, इरफान इनामदार,ओमप्रकाश नेमाने,अशोक बादाडे,सदाशिव प्रभाळे,बबन कुकडे,कामगार संघटनेचे राजु भोले असंघटीत मजदूर पंचायतचे बबन घुमरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement