Advertisement

एकनाथ शिंदेंचा गृह खात्यासाठी आग्रह

प्रजापत्र | Saturday, 30/11/2024
बातमी शेअर करा

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले. पण अद्याप सत्तास्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. तथापि, गृह खाते कोणाकडे? यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपद जर भाजपकडे गेले तर गृह खाते आमच्याकडे पाहिजे हा आग्रह असल्याचे शिरसाट यांनी आज शनिवारी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले.

Advertisement

Advertisement