नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरुन यश मिळवल्यानंतर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहे. अजित पवार हे गुरुवारी दिल्लीतल्या पक्ष कार्यालयामध्ये होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आधी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता. मात्र निवडणूक आयोगांच्या निकषांमुळे हा दर्जा निघून गेला. आता पुन्हा तो दर्जा प्राप्त करण्यासाठी पक्षाकडून धडपड सुरु आहे.अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्लीच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे. राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी दिल्ली विधानसभा निवडणुका लढवणं आवश्यक आहे. दिल्लीत आपला नक्की विजय होईल, असं विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं.
बातमी शेअर करा