बीड-चकलांबा पोलीस ठाणे हद्दीत रस्ता अडवल्याप्रकरणी व शेतात येत जात असल्याच्या कारणामुळे दोन गटात वाद होऊन झालेल्या मारहाणीत ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पोलिसांनी परस्परांविरोधात तक्रारी घेतल्या असून पुढील तपास सुरु असल्याचे सांगितले जाते.
सुरळेगावमध्ये वाळू वाहतूक करण्याऱ्या वाहनाला सोमवारी रात्री (दि.२५) ९ सुमारास युवराज सिरसाट व त्यांच्या काही लोकांनी अडविले.त्यानंतर मंगळवारी सकाळी ७ वाजता गाडी अडविल्याच्या कारणातून रवी भागवत आरबड,गोपी दिनकर आरबड,शुभम पाराजी आरबड,हरी दादासाहेब आरबड,गणेश तिर्थराज आरबड,सिद्धेश्वर पाराजी आरबड,धर्मराज आरबड यांनी युवराज सिरसाट यांच्यासह त्यांच्या आई गंगू सिरसाट,पत्नी राधा व इतर दोन लेकरांना मारहाण केली.त्यामुळे सात जणांविरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर युवराज सिरसाट, रामनाथ सिरसाट,सतीश सिरसाट,नारायण सिरसाट यांनी आरबड यांना शेतातून येतं जात असल्यामुळे बेदम मारले होते. त्यामुळे दोन्ही गटातील परस्परांविरोधात आलेल्या तक्रारीवरून ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस पुढील तपास करीत असल्याची माहिती प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनी दिली.
बातमी शेअर करा