Advertisement

सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत 'इतक्या' जणांचा होरपळून मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 21/01/2021
बातमी शेअर करा

पुणे-पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. “आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं,” मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.
“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

 

Advertisement

Advertisement