बीड-जिल्हा परिषदेची जागा स्वतःकडे हस्तांतरित करून घेतल्यानंतर त्या ठिकाणी गाळे बांधकाम सुरु केलेल्या नेकनूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने चपराक
लगावली आहे. या प्रकरणात स्वतः आ. विनायक मेटे यांनीच तक्रार केल्यानंतर ग्राम विकास मंत्र्यांनी सदर गाळे बांधकामाला स्थगिती दिली आहे.
बीड तालुक्यातील नेकनूर ग्रामपंचायतमध्ये झालेल्या राजकीय बदलाचे पडसाद आता थेट गावातील कामांवर उमटू लागले आहेत. नेकनूर ग्रामपंचायत जिल्हा परिषद सदस्य भारत काळे गटाच्या ताब्यात आहे. मात्र वर्षभरापूर्वी भारत काळेंनी आ.विनायक मेटेंची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत.
नेकनूर ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेकडून हस्तांतरीत करुन घेतलेल्या जागेवर ६० ते ७० गाळ्यांच्या बांधकामाला सुरुवात केली होती.मात्र हे गाळे बांधकाम झाल्यामुळे बाजाराला अडथळा येईल तसेच बांधकामाबाबत अनेक तक्रारी असल्याचे पत्र आ.विनायक मेटे यांनी ग्रामविकास मंत्र्यांना दिले. त्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांनी या गाळे बांधकामाला स्थगिती दिली आहे. त्यानूसार बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सदरचे गाळे बांधकाम तातडीने थांबविण्याच्या सूचना नेकनूर ग्रामपंचायतला दिले आहेत.ग्रामपंचायतमधील काळे-देशमुख जोडीला ही मोठी चपराक मानली जात आहे.
बातमी शेअर करा