Advertisement

निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यु

प्रजापत्र | Wednesday, 20/11/2024
बातमी शेअर करा

वसई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election २०२४) २८८ जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे. महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि इतर पक्षांच्या एकूण ४१३६ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मात्र मतदानाच्या दिवशीच एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. निवडणूक कर्तव्यावर जात असताना आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.    

 

याबाबत अधिक माहिती अशी की, निवडणूक कर्तव्यावर जात असलेल्या आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. सुमन संतोष यादव असे मृत महिलेचे नाव असून त्या ३९ वर्षांच्या होत्या. सुमन यादव या वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात मागील ५ वर्षांपासून आशासेविका म्हणून कार्यरत होत्या. 

 

आशासेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यु
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची ड्युटी आज नागले गावातील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक१ येथे होती. आज सकाळी सुमारे ६.३० वाजता, त्या नागले गावातील रेल्वे रुळ ओलांडत असताना त्या धावत्या रेल्वेखाली आल्या. यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला. सुमन यादव यांच्या आकस्मिक निधनाने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.  

Advertisement

Advertisement