भूम - मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून मतदान अधिकारी कर्मचारी आणि मतदारांना मतदान केंद्राच्या 200 मीटर पर्यंत चप्पल वापरण्यास बंदी करावी अशी अजब मागणी परंडा विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवाराने केली आहे परंडा विधासभा मतदारसंघातील एक उमेदवाराचे चिन्ह चप्पला आहे त्यामुळे आचार संहितेचे पालन व्हावे म्हणून हे निवेदन दिले असल्याचे अपक्ष उमेदवार गुरूदास संभाजी कांबळे यांनी सांगितले आहे
243 परंडा विधानसभा मतदारसंघात गुरूदास संभाजी कांबळे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. त्यांचा मतदान मशीनवरील मातानुक्रमांक 12 असून त्यांना निशाणी चप्पल मिळाले आहे. आदर्श आचारसंहिता नियमानुसार मतदान बूथ पासून 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराचे चिन्ह प्रकाशित किंवा प्रदर्शीत करण्यास सक्त मनाई आहे. चप्पल घालून मतदान केंद्रात गेल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो व आचार संहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये म्हणून अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी 243 परंडा विधानसभा यांना माझी निशाणी चप्पल असुन त्याचा प्रचार व प्रसार मतदान बूथ पासून 200 मीटरच्या आत आचार संहीता भंग होऊ नये याची मी स्वतः दखल घेत असुन त्याकरिता दी.20/11/24 रोजी मतदानाच्या दिवशी मतदान बूथच्या 200 मीटर अंतरामध्ये कोणतेही कर्मचारी, पदाधिकारी, उमेदवार,व मतदार यांनी जर 200 मीटरच्या आत चप्पल घालून प्रवेश केल्यास त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
चप्पल ही माझी निशाणी असल्याने ती पायात घातल्याने माझा प्रचार व प्रसार लोकांनी चप्पल पायात घालून प्रवेश केल्याने होऊ शकतो. व आचार संहिता भंग होणार याच्यात शंका नाही.तरी मतदान बूथ पासून 200 मीटरच्या आत बुधवार दि. 20/11/24 रोजी कोणत्याही व्यक्तीला चप्पल घालून प्रवेश न करु देणे हा आदर्श आचार संहितेचा भाग असुन या नियमाचे पालन काटेकोरपणे करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
त्यामुळे 200 मीटरच्या आत चपला ठेवण्याची व्यवस्था करणे.व मतदारास 200 मीटर अंतरामध्ये पायाला कोणतीही दुखापत होऊ नये याबाबत सुव्यवस्था करावी.तसेच सदरील निशाणी ही चप्पला असुन निशाणी म्हणून आपण कोणतीही एक डिझाईन देतो.परंतु चप्पला विविध डिझाईन मध्ये नागरिक घालतात आणी आपल्या निशाणीचा उल्लेख चप्पला असा आहे.त्यामुळे डिझाईनकडे लक्ष न देता उच्चराला महत्व द्यावे.व चप्पल घालून मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत प्रवेश दिल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये याची आपण सर्व विधानसभा क्षेत्रात दखल घ्यावी असे लेखी निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी 243 परंडा यांना दिले आहे.
या अजब मागणीमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह मतदान अधिकारी कर्मचारी नेत्यांची मोठी अडचण होणार असल्याने. यावर निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थितकाय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे आता मतदान केंद्रात कर्मचारी, पदाधिकारी, मतदारांना चप्पला घालून प्रवेश मिळणार का ? का 200 मीटर वरून चप्पला काडून मतदान केंद्रात प्रवेश मिळणार हे पाहावे लागणार.