मुंबई- विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद नसल्याचे सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही वाद नसल्याचे सांगितले. निवडणुका जिंकणे हेच आमचे लक्ष असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बातमी शेअर करा