Advertisement

 अमित शहांकडून सल्ले घ्यावेत इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंबावर आले नाहीत

प्रजापत्र | Sunday, 10/11/2024
बातमी शेअर करा

कराड : 'अमित शहा इतना झूठ बोलकर आपको नींद कैसे आती है', ज्यांनी 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केलाय त्यांना चक्की पिसायला पाठवू असे म्हणाले होतात. त्यांनाच आपण जवळ घेऊन बसला आहात. जेवढ्या जेवढ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना त्याना जवळ घेतले आहे. तरीही आनंद या गोष्टीचा आहे की, महाराष्ट्रात आल्यावर अमित शहा यांच्या भाषणाची सुरुवात, मध्य आणि शेवट उद्धव ठाकरे यांच्या नावाने होतो. मोठं आव्हान त्यांना उद्धव ठाकरे वाटतात. ही आमच्यासाठी सकारात्मक गोष्ट असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली.

 

 

कराड येथे प्रसार माध्यमाशी बोलताना सुषमा अंधारे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. आम्ही काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं याचे सल्ले अमित शहा यांच्याकडून घ्यावे, इतके वाईट दिवस ठाकरे कुटुंब आणि मातोश्रीवर आले नाहीत. ठाकरे बाणा महाराष्ट्रला माहित आहे. छत्रपती शिवरायांच्या पायाशी एकनाथ शिंदे यांनी खोटी शपथ घेतली, यावर अमित शहा यांच काय म्हणने आहे, ते त्यांनी सांगावे, असेही अंधारे म्हणाल्या. (Sushma Andhare News)

Advertisement

Advertisement