कोल्हापुर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरातून प्रचाराला सुरुवात केली आहे. सकाळी उद्धव ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून के.पी. पाटील निवडणूक लढवत आहेत. आज त्यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राधानगरी येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातून विधानसभेचे रणशिंग फुंकले. यावेळी सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकसभेच्यावेळी मी भाषणाची सुरुवात देशप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो अशी करत होतो. दसरा मेळाव्यात मी हिंदू बांधवांनो अशी करतो, पण, आताची ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही अशी आहे, अशी टीका ठाकरे यांनी महायुतीवर केली.