Advertisement

मनोज जरांगेंची विधानसभा निवडणूकीसाठी ठरली ही भूमिका

प्रजापत्र | Monday, 04/11/2024
बातमी शेअर करा

जालना: रात्री उशिरापर्यंत देखील मित्रपक्षांनी आपली यादीच पाठविली नाही. आणि एका जातीवर निवडणूक लढविणे शक्य नाही असे सांगत  मनोज जरांगे यांनी आता विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली आहे. जरांगे समर्थक म्हणून दाखल केलेले सर्व अर्ज मागे घेण्याचे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. त्यामुळे आता विधानसभेच्या रिंगणात मनोज जरांगे यांचे उमेदवार नसतील हे स्पष्ट झाले आहे. जरांगे यांच्या या भूमिकेमुळे अनेक प्रस्थापित पक्षांना आणि उमेदवारांना आता दिलासा मिळाला आहे. तर जरांगेंच्या आशीर्वादाकडे डोळे लाऊन बसलेल्यांची मात्र निराशा झाली आहे. मी कोणाला पाडायचे हे देखील सांगणार नसल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement

Advertisement