Advertisement

“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही

प्रजापत्र | Monday, 28/10/2024
बातमी शेअर करा

 बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी क्वचितच कोणाला असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मला शक्ती देण्याचे काम बारामतीकरांनी केले आहे आणि याची सुरुवात १९६५ पासून ते आतापर्यंत आहे. इतक्या निवडणुकींना उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथे राहावे लागायचे. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

Advertisement

Advertisement