Advertisement

अपक्ष अर्ज भरलेले 'ते ' जयदत्त क्षीरसागर वेगळेच

प्रजापत्र | Saturday, 26/10/2024
बातमी शेअर करा

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी अद्याप भरला नाही उमेदवारी अर्ज 

बीड दि. २६ (प्रतिनिधी ) ; बीड विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी जयदत्त सोनाजीराव क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे वृत्त 'प्रजापत्र 'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. मात्र ते जयदत्त क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नसून साक्षाळपिंपरी येथील रहिवासी असलेले जयदत्त सोनाजी क्षीरसागर आहेत. केवळ नामसाधर्म्यातून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज भरल्याचे वाटत होते. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. 
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून शुक्रवारी बीड विधानसभेसाठी साक्षाळपिंपरी ता. बीड येथील रहिवाशी असलेल्या जयदत्त सोनाजी क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. नाम साधर्म्यातून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अर्ज भरल्याचा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची उमेदवारी अद्याप दाखल झालेली नाही. 

Advertisement

Advertisement