बीड: विधानसभा निवडणूकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत २१ जागांवरील उमेदवार निवडण्यात आले असून यात बीड जिल्ह्यातील दोनच जागा जाहिर करण्यात आल्या आहेत. परळी आणि माजलगाव वगळता इतर ठिकाणचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.
परळीमधून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली तर माजलगावमधून राजकीय निवृत्ती जाहीर केलेल्या आ. प्रकाश सोळंकेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. जयसिंग सोळंकेंना हा मोठा धक्का आहे. इतर मतदारसंघाचे निर्णय मात्र अद्याप जाहीर नाहीत.
बातमी शेअर करा