बीड दि.२२ (प्रतिनिधी)- आ.पंकजा मुंडे याचे निकटवर्तीय भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पदाचा राजीनामा दिल्यांनतर दुसऱ्याच दिवशी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजेंद्र मस्के कुठल्या पक्षात प्रवेश करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजेंद्र मस्के यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या समर्थकांशी चर्चा करताना लवकरच आपण राजकीय भूमिका घेऊ असे संकेत दिले होते . भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजेंद्र मस्के यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती .त्यानंतर आज (दि.२२) मंगळवार रोजी राजेंद्र मस्के यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश घेतला आहे.
बातमी शेअर करा