Advertisement

निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार !

प्रजापत्र | Tuesday, 22/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई- राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांचे पुत्र माजी खासदार निलेश राणे (Nilesh Ran) हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. उद्या (दि.२३) रोजी ४ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत ते प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आभार मानले. आताची विधानसभा निवडणूक आम्ही युती म्हणून सामोरे जाऊन निवडून येणार असल्याचे राणे म्हणाले.

 

निलेश राणे कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार
निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, माजी खासदार निलेश राणे यांनी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार अशी पत्रकार परिषदेत घोषणा केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या सोशल मीडियावरील भाजप चिन्हाचे असलेले पोस्टर्स हटवले आहे. आता शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह असलेले पोस्टर्स त्यांनी अपलोड केले आहे. 

Advertisement

Advertisement