Advertisement

संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे आठ उमेदवार जाहीर

प्रजापत्र | Monday, 21/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी (Vidhansabha Election) राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा होत आहे. भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुतीमधील इतरही घटक पक्ष लवकरच यादी जाहीर करणार आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आघाडी घेतली असून ६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. आता, यंदा उदयास आलेल्या तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील परिवर्तन आघाडीने आपल्या ८ उमेदवारांची नावे जाहीर केली असून स्वाभिमानीच्या २ उमेदवारांची नावे उद्या २२ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान, परिवर्तन महाशक्तीकडून जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत आमदार बच्चू कडू यांचं नाव असून बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना अचलपूर मतदारसंघातून प्रहारच्या चिन्हावर उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. 

 

 

परिवर्तन महाशक्तीचे घोषित करण्यात आलेले उमेदवार

 
१. अचलपूर - बच्चू कडू  - प्रहार

२. रावेर - अनिल चौधरी - प्रहार

३. चांदवड - गणेश निंबाळकर  - प्रहार

४. देगलूर - सुभाष सामने - प्रहार

५. ऐरोली - अंकुश कदम- महाराष्ट्र स्वराज पक्ष

६. हदगाव हिमायतनगर - माधव देवसरकर - महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

७. हिंगोली - गोविंदराव भवर - महाराष्ट्र राज्य समिती

८. राजुरा - वामनराव चटप - स्वतंत्र भारत पक्ष

 

 

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील शिरोळ व मिरज या दोन मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उद्या जाहीर करण्यात येणार आहेत. 

Advertisement

Advertisement