मुंबई- महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. यावेळी सरकारने आपले रिपोर्ट कार्ड -२०२२ सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित पवार उपस्थित होते. 'महायुती- काम हिच ओळख' असे टायटल असणारे रिपोर्ट कार्ड या त्रयींनी सादर केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विविध विकासकामे करत आहोत. त्याचा लेखाजोखा २०२२ ते २०२४ पर्यंतच्या रिपोर्ट कार्डमध्ये सादर केल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
यावेळी अजित पवार म्हणाले, अनेक विरोधकांकडून आमच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने सांगितलं जात आहे. पण, या योजना देत असताना निवडणुका जवळ येत असताना कॅबिनेटच्या दोन-तीन बौठकांमध्ये हे निर्णय घेतले गेले. अर्थसंकल्पात विचार करून आम्ही योजना मांडल्या. सर्व घटकांना न्याय देण्याच प्रयत्न आम्ही केला. खात्यात पैसे आल्यानंतर 'पैसे परत जाणार' अशा अफवा पसरवल्या गेल्या. एफडीआय देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगली गुंतवणूक झाली आहे. काहीही बोलून महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करायचा. म्हणून हे रिपोर्ट कार्ड महायुतीने सादर केले आहे.