आष्टी दि.१४ (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना आष्टीत आ.बाळासाहेब आजबे यांनी एका विकास कामाच्या उदघाटनप्रसंगी आष्टीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार आहे असा दावा केला.यात समजा काही खालीवर झालेच तर आपण भीमराव धोंडे यांच्या पाठीशी उभा राहू प्रसंगी तेही माझ्या पाठीशी उभे राहतील असे वक्तव्य केल्याने आ.सुरेश धस यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
आष्टी तालुक्यातील महसूल कर्मचारी निवासस्थान व आष्टी नगरपंचायत हद्दीतील १५ कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) सकाळी ११ वाजता झाला.या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब शिंदे,माजी जि.प सदस्य डॉ. मधुकर हंबर्ड,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले, महादेव महाजन,हरिभाऊ दहातोंडे, परशुराम मराठे, संदीप सुंबरे, सुखदेव पोकळे यांचे प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार आजबे म्हणाले की, आष्टी नगरपंचायत अंतर्गत आपण मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे.आष्टी, पाटोदा, शिरूर या तिन्ही नगरपंचायत मध्ये जवळपास पंधरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे कामे करताना नगरपंचायतला विश्वासात घेऊन कामे कार्यकर्त्यांनी करावीत कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची पण खबरदारी संबंधित गुत्तेदार यांनी घ्यावी आष्टी येथील शनी मंदिर व फत्तेशहा बुखारी दर्गा परिसरात नारळ फोडून कामांचा शुभारंभ करण्यात आला.तर आष्टी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी १३ कोटी ८० लाखांच्या महसूल निवासस्थानाच्या इमारतीचे उद्घाटन पंचायत समिती शेजारी परिसरात करण्यात आले.जनतेला जर मान्य असतील तर येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला मायबाप जनता ही पुन्हा निवडून देईल.आपण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली परंतु एक रुपयालाही कोणाच्या लाजिंदार झालो नाहीत. येणारी निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर व विकास कामाच्या जोरावर आपण सामोरे जाणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले. आष्टीची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे.तसे झाल्यास भीमराव धोंडे माझ्या पाठीशी उभे राहतील.किंवा यात उमेदवाराबाबत काही खाली वरी झाले तर मी धोंडे यांच्या पाठीशी उभा राहिलं असे आजबे म्हणाले.दरम्यान यामुळे आता आष्टी विधानसभा मतदारसंघातील चित्र कसे रहाणार ?धोंडे आजबे एकमेकांना बळ देणार का ?हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी संतोष कदम, बबन काळे,गणेश पडोळे,पंडित पोकळे,काका पोकळे,दिपक पिसाळ,श्रीराम गोंदकर, दिलीप चव्हाण,विजय देशमुख, देवेश शेट्टी, अय्याज कुरेशी, वाहेद सय्यद,गणेश धोंडे, माजेद शेख, विलास गायकवाड,मुकेश सायकड,काशीगिर शिंगारे,कृषी वाल्हेकर, आकाश पवळे, सुनिल निकाळजे यांच्यासह आष्टी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा