Advertisement

'लाडकी बहीण' योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ

प्रजापत्र | Friday, 11/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई : महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी १५ ऑक्टोबर २०२४ ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता १५ ऑक्टोबर २०२४ रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे.

Advertisement

Advertisement