Advertisement

मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात

प्रजापत्र | Friday, 04/10/2024
बातमी शेअर करा

यवतमाळ येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. कोपरा या गावात मध्यरात्री दोन वाजता हा अपघात झाला आहे. यात चालक गंभीर जखमी झाला आहे. मंत्री राठोड यांच्या कारने मागून पिकअपला धडक दिली आहे. अपघातानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार,हा अपघात यवतमाळ येथील कोपरा या गावाजवळ झाला. अपघातानंतर गाडीमधील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड बचावले. राठोड यांच्या कारने पाठिमागून समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. मंत्री राठोड ३ ऑक्टोंबर रोजी यवतमाळ दौऱ्यावर होते. रात्री उशीरा प्रवास करत असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. 

गाडीने समोर असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या. यामुळे मंत्री राठोड बचावले. पण, ड्राइव्हर जखमी झाला आहे. समोर असलेल्या पिकअपचा ड्राइव्हरही जखमी झाला आहे. 
 

Advertisement

Advertisement