मुंबई - सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किंमान १०० रुपयांच्या स्टँप पेपवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. १००, २०० आणि ५०० रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. मात्र, यापुढे १०० आणि २०० रुपयांचे स्टँप पेपर इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान ५०० रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे. राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टँप जारी केला जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा