पुणे : बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर आता तसाच प्रकार पुण्यामध्येही वानवडी भागात झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात शाळेतील आठ वर्षांच्या मुलींवर व्हॅन चालकाने अत्याचार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वानवडी भागात घडली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४५ वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे.
३० सप्टेंबरला हा स्कुल बस ड्रायवर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहचला. शाळा सुटल्यावर मुलींना पुन्हा घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडित मुलींना ड्रायव्हरच्या केबीनमधे बोलावले आणि त्यांच्यासोबत अश्लील चाळे केले. एका पिडीत मुलीने याबाबत पालकांना याबाबतची माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. पिडीत मुलींची प्रकृती व्यवस्थीत आहे. नियमाप्रमाणे प्रत्येक स्कुल बसमधे एक महिला केअर सेंटर असणं बंधनकारक आहे. या स्कुल बसमधील महिला केअर टेकर यावेळी स्कुल बसमधे होती का हा प्रश्न उपस्थित होतोय. या घडलेल्या घटनेनंतर पालकांमध्ये आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.