तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन येताना वेगातील पिकअप पलटी होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यु तर १९ जण जखमी झाल्याची घटना मंगळवेढा सोलापूर महामार्गावर कामती खुर्द गावाजवळ घडली. या घटनेने ऐन घटस्थापनेच्या दिवशी गोणेवाडी गावावर शोककळा पसरली
अधिक माहिती अशी कि,मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथील बागडेबाबा नवरात्र महोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तुळजापूरहून देवीची ज्योत घेऊन गावाकडे परतत असताना नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर कामती खु गावाजवळ स.६.३० ते ७ च्या दरम्यान आली असता भरधाव वेगातील पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यानंतर सदरचे पिकअप कठड्यावरून पलटी होऊन रस्त्यालगत असलेल्या सिमेंटच्या गटारीत पडले.
यामध्ये प्रदीप क्षीरसागर व नेताजी कराळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये महेश बंडगर, वैभव हजारे, सोचल मुलाणी, रोहित माने, रोहित कसबे, समाधान मासाळ, किरण हजारे, दादा लोखंडे,राजू होरे, सुहास मासाळ, समाधान तरटे,सौरभ क्षीरसागर, अभिजीत कसबे, दयानंद बंडगर, आप्पासाहेब मासाळ,सागर मलपे, विश्वजीत मासाळ, अक्षय कांबळे, संतोष मोहिते, हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.