छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला हादरवणारी एक घटना घडली असून सर्वांनाच धक्का बसलाय. सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन एका महिलेनं गोदावरी नदीत उडी मारत आपला जीव संपवलाय. ही आई डॉक्टर असून तब्बल दोन तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर केवळ आईचाच मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सहा महिन्याच्या चिमूकलीचा शोध सुरु आहे. या घटनेनं संपूर्ण शहर हळहळले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये महिला डॉक्टरनं सहा महिन्यांच्या बाळासह उडी मारून आत्महत्या केली असून नक्की या महिलेनं उडी का मारली याचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पैठणच्या पाटेगावच्या पुलावरून गोदावरी नदीपात्रात महिलेनं सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन उडी टाकली. डॉक्टर पूजा प्रभाकर व्हरकटे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. ३० वर्षे वय असणाऱ्या या महिलेला दोन मुले असून . सहा वर्षाचा मोठा मुलगा असून सहा महिन्याचा छोटा मुलगा आहे . मंगळवारी संध्याकाळी हा सगळा प्रकार घडला असून महिला डॉक्टरचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून बाळाचा शोध सुरु आहे.