Advertisement

ज्यांनी बोगसगिरी करुन लाडकी बहीण योजनेचे पैसे उचलले

प्रजापत्र | Monday, 30/09/2024
बातमी शेअर करा

मुंबईः मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्त्रीयांऐवजी पुरुषांनीच एक किंवा एकापेक्षा जास्त अर्ज केल्याचा प्रकार पुढे आला आहे. असे प्रकार रोखण्यासाठी राज्य शासन कठोर पावलं उचलत असून अशा लोकांच्या बँक खात्यावर कारवाई होणार आहे. एका व्यक्तीने लाडकी बहीण योजनेचे ३८ अर्ज भरुन पैसे उचलल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघड झाला होता.

 

 

राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एका व्यक्तीने ३८ अर्ज भरलेत. त्याने ⁠वेगवेगळ्या नावाने हे अर्ज भरले आणि पैसे काढले. त्यामुळे ⁠संबंधित बँकांना याबाबत कळवून पैसे परत मिळवण्याचे आदेश दिलेत आहेत.तटकरे पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांचे बँक खाते सील केले जाणार आहेत. ⁠त्या खात्यांशी कोणतेही शासकीय व्यवहार केले जाणार नाहीत. ⁠१५-२० दिवसांमध्ये व्हेरीफिकेशन केले जाईल. ⁠२५ तारखेपासून जे पैसे मिळतायेत त्या महिलांनी पहिल्या दोन महिन्यात अर्ज केले होते त्यांना दिले जात आहेत.

Advertisement

Advertisement