पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढता आलेख सुरुच असताना आता बारामतीमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. बारामतीमध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा खून कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. मात्र, या विद्यार्थ्यांचा खून महाविद्यालयाच्या परिसरात झाल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला.
बातमी शेअर करा