Advertisement

'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात

प्रजापत्र | Saturday, 28/09/2024
बातमी शेअर करा

मुंबई - राज्य सरकारने सुरू केलेल्या (Ladki Bahin Yojana) माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत गप महिना दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. थोड्याच दिवसात प्रचंड लोकप्रिय झालेल्या या योजनेचा पुढचा म्हणजेच तिसरा हप्ता २९ सप्टेंबर रोजी वाटप केला जाणार आहे. दरम्यान महिलांच्या खात्यात या तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.

 

 

 

 

या योजनेच्या लाभासाठी ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरूवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात जमा होत आहेत. तर ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यात १५०० रुपये लवकरच जमा होतील.(Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख ३१ हजार २९४ नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. पण महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीयेत. यापूर्वी जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ३००० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४५०० रुपये मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

तुमच्या खात्यात पैसै जमा झाले का?
लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेअंतर्गत जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड जर लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदा तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करून घ्या. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे खात्यात पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. येथे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते बघू शकतात. तसेच बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात.

 

Advertisement

Advertisement