मुंबई - मुख्यमंत्री (CM YEKHNATH SHINDE) एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात येणार, याबाबत उत्सुकता होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री (Girish Mahajan) गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.
बातमी शेअर करा