मुंबई- आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly elections) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. रावेरमधून तृतीयपंथी शमिभा पाटील यांना वंचितने उमेदवारी दिली आहे. शमिभा पाटील ह्या लेवा पाटील समाजातील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.
सिंधखेडा राजा येथून सविता मुंढे, वाशीमधून मेघा किरण डोंगरे, धामनगाव रेल्वे येथून निलेश विश्वकर्मा, नागपूर दक्षिण पश्चिम येथून विनय भांगे, साकोली येथून डॉ. अविनाश नन्हे, नांदेड दक्षिण मधून फारुक अहमद, लोहा येथून शिवा नरंगले, औरंगाबाद पूर्व येथून विकास रावसाहेब दांडगे, शेवगाव येथून किसन चव्हाण आणि खानापूर येथून संग्राम कृष्णा माने यांची वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचितने त्यांच्या आघाडीमधील भारत आदिवासी पार्टी (BAP) आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी (GGP) च्या उमेदवारांचीही घोषणा केली आहे. अनिल जाधव हे भारत आदिवासी पार्टीचे चोपडा येथून उमेदवार असतील. तर हरीश उके यांना रामटेकमधून उमेदवार दिली आहे.