Advertisement

आरक्षण द्या,मी राजकीय भाषा बोलणं बंद करेन

प्रजापत्र | Tuesday, 17/09/2024
बातमी शेअर करा

मला व समाजाला राजकारणात जायच नाही आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे मी राजकीय भाषा बोलणार नाही आरक्षण द्या, आरक्षण देण्याची हि सरकार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शेवटची संधी आहे असे मनोज जरांगे यांनी मंगळवार (दि.१७) रोजी अंतरवाली सराटी येथे सांगीतले.

 

या ठिकाणी (दि.१६) च्या मध्यरात्री पासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा मंगळवार (दि.१७) रोजी पहिला दिवस आहे.या वेळी बोलतांना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना आरक्षण देण्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगितले.तुम्ही आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या निवडणूक मध्ये आमच्या नावाने ओरडु नका समाज आता सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहे, सरकारला आता वेळ वाढवुन देणार नाही, आरक्षण न दिल्यामुळे उमेदवार उभे करायचे का समोरच्यांचे पाडायचे हे समाज विचारत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली आहे त्यांच्या मागणी बाबत शासनस्तरावर चर्चा सुरु आहे या बाबत पत्र मा. जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत शासनाकडे पाठवले आहे असे विजय चव्हाण तहसिलदार, अंबड यांनी सांगितले आहे

Advertisement

Advertisement